Pune News : पुणे : इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने देशभरातील प्रमुख स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग केंद्रे उभारण्याण्यासाठीच्या नियमावलीचा ठराव मंजूर केला आहे. स्थानकाच्या आवारात आणि वाहनतळामध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकासह शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज स्थानकामध्ये लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याने लाभधारक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
पुणे, शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज स्थानकामध्ये लवकरच सुविधा
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे धोरण रेल्वे मंत्रालयाने स्वीकारले आहे. त्याअंतर्गत देशातील प्रमुख स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी (Pune News) आणि मोटारींसाठी चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, पुणे या शहरांचा समावेश आहे. पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत या शहरांमधील प्रमुख स्थानकांवर ई-चार्जिंग सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.
पुणे महापालिकेने आता इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीच्या नियमावलीचा ठराव मंजूर केला आहे. (Pune News) रहिवासी वापर, वाणिज्य आणि औद्योगिक वापराकरिता प्रत्येकी एक, दोन आणि तीन याप्रमाणे चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या पार्भूमीवर पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज या स्थानकांवर ही सुविधा उभारली जाणार आहे. या स्थानकांच्या वाहनतळाच्या जागेत ही सुविधा उभारण्यात येईल. पुणे रेल्वे स्थानकाच्या ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहतनळात ही सुविधा सुरू केली जाणार आहे. सध्या कोल्हापूर स्थानकाच्या वाहनतळाच्या जागेत चार्जिंग सुविधा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर ती सुरू करण्यात येणार आहे.
चार्जिंग सुविधा सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहे. हे कंत्राट १ ते ३ वर्षांचे असेल. या कंपन्या त्यापोटी रेल्वेला वर्षाला ठराविक रक्कम देतील. (Pune News) या सुविधेमुळे प्रवाशांची सोय होण्यासोबतच रेल्वेलाही महसूल मिळणार आहे.
पुणे विभागात सध्या चार स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात इतरही स्थानकांवर ही सुविधा सुरू केली जाईल, (Pune News) असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक ! पतीने मुलासमोरच केला पत्नीचा खून
Pune News : पीटी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग