Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : ‘त्या’ खुनाचा व्हिडिओ असल्याचे सांगत पोलिसानेच केले ब्लॅकमेलिंग!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 1 September 2023, 11:45

Daund News  : दौंड : वरवंड (ता. दौंड) येथील नेमचंद गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा वनविभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून करण्यात आला होता. २७ मार्च २०२२ रोजी घडलेल्या या खून प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. गांधी खून प्रकरणाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे प्रकरण संपवण्यासाठी मला १५ लाख रुपये रोख द्या, अशी मागणी वरवंड येथे राहणाऱ्या व पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांनी केल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामुळे या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू झाला आहे.

प्रकरण दाबण्यासाठी १५ लाखांच्या लाचेची मागणी

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सागर गोविंद शिंदे (रा. वरवंड) असे या आरोपीचे नाव असून, हा पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई आहे. वरवंड येथे वहिनीचे वडील नेमचंद गांधी यांचा २७ मार्च २०२२ रोजी राकेश भंडारी, प्रणय राजेंद्र भंडारी, विजय राजाराम मंडले , अतुल अशोक जगताप यांनी वन विभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. (Daund News ) मात्र, या आरोपींनी गांधी हे घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, एका कथित व्हिडिओमुळे त्यांनी एक वर्षापूर्वी केलेल्या या खुनाचे बिंग फुटले आहे.

दरम्यान, सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात असून, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात हा कथित व्हिडिओ माझ्याकडे असल्याची बतावणी करत, १५ लाखांच्या मागणीसाठी एक पोलीस ब्लॅकमेल करीत असल्याचे आता समोर आले आहे. (Daund News ) या प्रकरणी राहुल चयनलाल भंडारी (वय ४४, व्यवसाय पेपर एजन्सी रा. वरवंड, शिवाजी चीक ता. दौंड जि. पुणे) यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फीर्यादीनुसार, सागर शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे हा २४ जुलै २०२३ रोजी आरोपी राकेश भंडारी याच्या घरी येऊन ठरल्यानुसार माझे १५ लाख रुपये दे, असा हट्ट करू लागला. एवढे पैसे कशाचे, अशी विचारणा राहुल याने भावाला केल्यानंतर देखील त्याने नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, राकेश भंडारी याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरवंड येथील शाखेतून ९ लाख रुपयांची एफ.डी. मोडुन पैसे घरी आणले. त्यानंतर उत्सुकतेपोटी भाऊ राहुल याने पुन्हा पुन्हा खोदून विचारणा केली. त्यानंतर राकेशने सर्व गोष्टींचा उलगडा केला. (Daund News ) तुझे सासरे नेमीचंद गांधी यांचा खून केल्याचा व्हिडीओ माझ्याकडे असल्याचे सांगत मला तो बॅकमेल करत आहे. पैसे न दिल्यास घरातील सर्वांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तो देत असल्याचे स्पष्टीकरण राकेशने भाऊ राहुल याला दिले. त्यानंतर भंडारी कुटुंबियांनी घाबरून सागर शिंदे याला गावातील गोपीनाथ मंदिरासमोर ८ लाख रुपये रोख खंडणी स्वरूपात दिले.

दरम्यान, घडलेल्या घटनेची फिर्याद राहुल भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. या प्रकारानंतर सागर शिंदे याच्यावर खंडणीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Daund News ) या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.

सागर शिंदे हा पोलीस कर्मचारी असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या खुनाच्या घटनेतील आरोपी अटक झाल्यापासून सागर शिंदे हा फरार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध

Daund News : सदानंदाचा येळकोट… करत दुसऱ्या श्रावण सोमवारी खंडेरायची पालखी भुलेश्वराच्या भेटीला!

Daund News : दौंड तालुक्यातील एकेरीवाडीतील जिल्हा परिषद शाळेत मद्यपींचा उच्छाद; दारूच्या बाटल्या उचलण्याची विद्यार्थ्यांवर वेळ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pimpari News : सोसायटीधारकांच्या पाण्याची ‘हमी’ कोण घेणार? भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.