Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज; लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका, महापालिका 70 हजार खांबांसंदर्भात निर्णय घेणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 October 2025, 14:45
Pune News: Good news for Pune residents; Soon relief from traffic jams, municipal corporation will decide regarding 70 thousand poles

Photo-Social Media

पुणे: पुणे शहरातील (Pune News) वाढती वाहतूक कोंडी (Punr Traffic Jam)  ही नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनली आहे. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महापालिकेने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि गर्दीचे चौक याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे घटक हटवण्याचे काम महापालिका आणि महावितरण यांच्या संयुक्त समितीकडून हाती घेतले जाणार आहे. या समितीमार्फत रस्त्यावर उभे असलेले विद्युत खांब, फीडर पिलर तसेच इतर अडथळे दूर करून पुणेकरांना कोंडीतून दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही दिवसांपूर्वी पथ विभागाच्या बैठकीत वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शहरातील 32 महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी दोनशेहून अधिक कनिष्ठ अभियंत्यांची टीम प्रत्यक्ष क्षेत्रभेटीस उतरली. या पाहणीत रस्त्यांवर आणि चौकांत विजेचे खांब, फीडर पिलर, पदपथांवरील अतिक्रमणे आणि इतर अडथळे वाहतुकीला मोठा त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर झालेल्या बैठकीत महापालिका, वाहतूक पोलीस आणि महावितरण या तिन्ही यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की, “शहरातील अनेक चौक आणि पदपथांवर विजेचे खांब व फीडर पिलर उभे असल्याने वाहनांना व पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हे अडथळे हटवून त्यांचे स्थानांतर करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि नियोजन करणारी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

महावितरणच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील पदपथांवर सुमारे 70,000 विद्युत खांब उभे आहेत. यापैकी अनेक खांब थेट वाहतुकीच्या मार्गात आल्याने गाड्यांना व पादचाऱ्यांना सतत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या खांबांचे स्थलांतर करून योग्य जागी उभारणी करणे आवश्यक ठरत आहे. यासाठी सर्वेक्षण करून पर्यायी जागांची निवड करण्याचे काम नव्याने स्थापन होणाऱ्या समितीकडे सोपवले जाणार आहे.

समितीने सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब आणि फीडर पिलर टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

महापालिकेचा विश्वास आहे की या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळेल. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, ही कारवाई दीर्घकालीन दृष्टीने पुणेकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post
Balasaheb Thackeray: 'Balasaheb's body in Matoshree for 2 days...', Shinde leader's claim creates a stir

Ahilyanagar News: पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp