Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar News: पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 October 2025, 14:51
Balasaheb Thackeray: 'Balasaheb's body in Matoshree for 2 days...', Shinde leader's claim creates a stir

Photo-Social Media

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar News) जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले (Pune News) असून महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, पंचनामा करत असताना धनेगावचे तलाठी आकाश रामभाऊ काशिकेदार यांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी घडली. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दसऱ्याच्या दिवशीसुद्धा तलाठी काशिकेदार यांनी आपली जबाबदारी पार पाडत सकाळी 8 वाजल्यापासून धनेगाव परिसरात शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. शेतकरी सुहास काळे, संदीप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे नदीकाठाने जात असताना गवतात लपलेल्या सापावर त्यांचा पाय पडला. क्षणात सर्पदंश झाला आणि त्यांना भोवळ येऊ लागली.

घटनेनंतर सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना उचलले, धीर दिला आणि जवळच्या वस्तीवर नेले. नदीमुळे रस्ता बंद असल्याने बंधाऱ्यावरूनच उचलत त्यांना गाठीतून बाहेर काढण्यात आले. अखेर शेतकरी मंडळींनी शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे त्यांना दाखल केले. या कार्यात सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी शिलादीप हॉस्पिटलला भेट देऊन तलाठी काशिकेदार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या आठवडाभरात मुसळधार पाऊस झाला. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, आतापर्यंत 3,40,293 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 1034 गावांतील 4,85,166 शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31
Next Post

Shocking news : मोबाईलवर गेम खेळू नकोस..! मोठी बहीण ओरडली म्हणून लहान भावानं केलं असं काही कृत्य, वाचून बसेल धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp