Pune News : लोणावळा रेल्वे स्थानकात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याच्या कारणाने लोणावळा-पुणे मार्गावर दुपारी धावणाऱ्या २ वाजून २५ मिनिटांची तसेच ३ वाजून सात मिनिटांची तर पुणे-लोणावळा मार्गावरील सकाळी १०.२५ व ११.४५ मिनिटांची लोकल २६ ते २९ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.(Pune News)
अचानक लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
मुंबई विभागातील लोणावळा स्थानकावर वाहतूक ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे २७ ते २९ जून या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरुन लोणावळ्यासाठी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.(Pune News) तसेच, लोणावळ्यावरून पुण्याला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी लोकल आणि लोणावळ्यावरून शिवाजीनगरला दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.(Pune News)
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी स्थानकांमधून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशी संख्या अधिक आहे. त्यामुळे आकुर्डी रेल्वे स्थानकातील लोकल रद्दचे फलक लागल्याचे पाहून प्रवाशांची तारांबळ उडाली. (Pune News)पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने रिक्षा करून निगडीपर्यंत हेलपाटे मारून पुण्यासाठी बसने प्रवास करावा लागला.
दरम्यान, आकुर्डी स्थानकात उद्घोषक नसल्याने ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद आहे. परिणामी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता नाकी नऊ आले होते. लोकल रद्दचे फलक लागल्यानंतरदेखील प्रवाशी सतत लोकलची विचारणा करण्यासाठी येत होते. आकुर्डी येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच या भागात काम करणारे कर्मचारी लोकलने अप-डाऊन करतात. लोकल रद्द झाल्यामुळे पैसे खर्च करून बस आणि रिक्षाचा पर्यायी मार्ग त्यांन निवडावा लागला, त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागली.(Pune News)
याबाबत बोलताना रेल्वे मुख्य बुकिंग अधिकारी महेंद्र आयगोळे म्हणाले की, लोकल रद्दचा आदेश मुख्य कार्यालयामधून आल्यानंतर एक दिवस अगोदर या संदर्भातील फलक सायंकाळी लावण्यात आले होते. मात्र, बरेच प्रवाशी याबाबत अनभिज्ञ असल्याने दुसऱ्या दिवशी लोकल रद्दचे फलक पाहिल्यानंतर अवाक झाले. उद्घोषक नसल्याने प्रवाशांकडून सारखी विचारणा केली जात होती.(Pune News)