Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सदाशिव पेठमध्ये तरुणी हल्ला प्रकरण; तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या त्या तरुणाला चार दिवसांची पोलिस कोठडी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 June 2023, 14:25

Pune News पुणे : एकतर्फी प्रेमातून पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करणाऱ्याला माथेफिरु तरणाला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune News) आरोपीला बुधवारी (२८ जून) सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Pune News)

शंतनू लक्ष्मण जाधव (२१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून त्याने मंगळवारी (२७ जून) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे.

 

तरुणीवर हल्ला करत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

अटक केल्यानंतर जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

आरोपी जाधव याच्या रक्ताचा नमुना घेऊन तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. तर जाधव याने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. हा गुन्हा जाधव याने कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचादेखील पोलिस तपास करीत असल्याचा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Pimpari News : दारु पिलेल्या दोन तरुणांनी भरदिवसा कोयत्याने फोडल्या नव्याकोऱ्या चारचाकी गाड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.