Pune News : पुणे : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच गर्दी होते. गौतमी पाटील म्हणजे टाळ्या, शिट्ट्या अन् राडा हे जणू समीकरणच झाले आहे. तरिही गौतमीचे कार्यक्रम नेहमी हाऊस फुल्ल असतात. गौतमीच्या तारखा मिळणे अवघड असते. यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना गौतमीच्या तारखा मोठ्या मुश्कीलीने मिळाल्या होत्या. मात्र, कोल्हापूर पोलीस प्रशासनाने तिचा कार्यक्रम अचानक रद्द केला. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
काय आहे कारण?
मनोरंजन विभाग आणि पोलिसांनी गौतमीच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव काळात पोलिसांवर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देता येणार नसल्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे. (Pune News) त्यामुळे गौतमीचे २२ आणि २४ सप्टेंबरला कोल्हापूरच्या ग्रामीण भागात होणारे कार्यक्रम रद्द झाले आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
सणासुदीच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना गर्दी होते. आयोजक गौतमीला आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात बोलावण्यावर भर देत असतात. पण सणासुदीत पोलिसांकडे बंदोबस्ताचे काम असते. त्यामुळे पोलीस कोणत्याही इतर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत. (Pune News) त्यामुळे गाण्याच्या आणि स्टेज कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त पुरवला जात नाही. गौतमी पाटील हिलाही याच कारणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन कमाईच्या काळात गौतमीसह अनेक कलाकारांना देखील याचा फटका बसत आहे. शिवाय गौतमीच्या कार्यक्रमांना आता कोल्हापूरकरांना देखील मुकावे लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कयानीचा मावा केक अन् चितळेंच्या बाकरवडीवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब!
Pune News : लाडका बाप्पा आला अन् हाताला हंगामी रोजगार मिळाला