Pune News : पुणे : मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मोडतोड, जाळपोळ सुरू आहे. अनेकदा आंदोलकांकडून लालपरीला लक्ष केले जाते. परिणामी खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी लालपरीला सक्तीची विश्रांती देण्यात येत आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकले आहे. कोरोना काळानंतर आता मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. मराठा आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांत एसटीचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्य परिवहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकले
राज्यात मराठा आंदोलन उग्र झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वत्र साखळी उपोषण आणि ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जात आहे. मात्र, आंदोलकांकडून लालपरीला लक्ष केले जात आहे.(Pune News) यामुळे काही ठिकाणी एसटी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत होती. एसटीला चांगले दिवस येत होते. परंतु मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. त्याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे १७ ते २० कोटींचे नुकसान झाले आहे.
मराठा आरक्षणाची तीव्रता वाढत असताना सर्वत्र एसटी बसेसवर जाळपोळ आणि दगडफेक होत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये दोन दिवसांपासून एकही बस बाहेर पाठवली जात नाही. तसेच बस स्थानक बस येत नाही. यामुळे बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून सुमारे १३२ गाड्या रद्द केल्या आहेत. (Pune News) यामुळे येवला आगाराचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. नागपूर विभागाच्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात जाणाऱ्या बस फक्त पुसदपर्यंत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नागपूर विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस चौकीत गोंधळ; पोलिसांनाही धक्काबुक्की
Pune News : जिल्ह्यातील शेकडो कलाकारांचे मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी साखळी उपोषण
Pune News : कात्रजमध्ये अग्नितांडव! गॅस सिलिंडरच्या स्फोटात झोपड्या जळाल्या