Pune News : पौड, (पुणे) : पिरंगुट (ता. मुळशी) हद्दीतिल उरवडे रस्त्यावर असलेल्या गोदामामध्ये तयार केलेला सुमारे अकरा लाख रुपयांच्या दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहेत. हि घटना मंगळवारी (ता. १२) घडली आहे. याबाबत पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा फुड्स उत्पादक तेजाराम गणेशराम चौधरी (वय ४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
परिसरात खळबळ..
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट येथील उरवडे रस्त्यावरील कोकाकोला कंपनी परिसरात एक गोदाम आहे. या गोदामात कृष्णा फुड्स यांच्यावतीने खवा, बर्फी, मिठाई तसेच अन्य पदार्थ बनविले जातात. (Pune News) यावेळी या ठिकाणी भेसळयुक्त खवा व बर्फी बनवली जात असल्याने तेथील गोदामावर पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त छापा टाकून अन्न अस्थापनेची तपासणी केली. त्यात बर्फी, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती व पाम तेल असा एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
कृष्णा फुड्समधील उत्पादनांची अधिक तपासणी केली असता तेथील आस्थापनेत त्रुटीं आढळल्याने अन्न सुरक्षा कायद्यानुसार त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. (Pune News) तसेच सुमारे २ टन तयार बर्फी जागेवरच नष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, बनविलेले पदार्थ पिरंगुट, घोटावडे फाटा, भूगाव, भुकूम तसेच मुळशीतील विविध दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात येणार होते. अशा बनावट, भेसळयुक्त तसेच आरोग्याला घातक ठरणाऱ्या उत्पादनाची निर्मिती कुठे होत असेल तर नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी १८००२२२३६५ संपर्क साधावा.
सदरची कामगिरी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखील सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस हवालदार रॅाकी देवकाते, (Pune News) पोलिस नाईक सिद्धेश पाटील, साहिल शेख तसेच पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड, सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गणेशोत्सवातील गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
Pune News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार; एक गंभीर