Pune News : पुणे : लष्करी गणवेशात फिरणारा एका तोतयाला पुणे लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर शनिवारी (ता.०२) पकडले आहे.
निरज विक्रम विश्वकर्मा (वय २०, रा. लटेरा, पो. धौराहरा, इटावा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे पकडण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यात पास नसताना केला होता प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे राखीव दलाचे पी के यादव, अशोक चांदूरकर यांना शनिवारी एक लष्करी अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर संशयितरित्या फिरत आहे. (Pune News ) अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निरज विश्वकर्मा याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही ओळख पत्र नव्हते. मात्र त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पैरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आला. (Pune News ) लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपी विश्वकर्मा यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये, तो लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घालून दिल्ली कॅटोंमेंट परिसरात फिरला होता. तसेच धक्कादायक बाब म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. या वेळी त्याने लष्करी गणवेश घालून कोणताही पास नसताना प्रवेश केला होता. (Pune News ) तेथे लष्करी अधिकाऱ्यांबरोबर भेट घेतली. तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढल्याचे तपासात समोर आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वानवडीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात