Pune News : पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील यांचे वडील धुळ्यातील सूरत बायपास हायवेवर बेवारस अवस्थेत ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याची बातमी समोर आली होती. तेव्हा स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गौतमी पाटीलने या वृत्ताची दखल घेतली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ती व्यक्ती कोण आहे. यासाठी व्हायरल केला. (Pune News) ओळख पटवण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर १० मिनिटांत १०० हून अधिक कॉल कार्यकर्त्यांना गेले. ही व्यक्ती गौतमी पाटील यांचे वडील आहेत अशी माहिती लोकांनी दिली.
तोपर्यंत कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. तरीही याची खात्री न पटल्याने रात्री नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांना प्रत्यक्ष येऊन तुम्ही शहानिशा करा असं कार्यकर्त्यांनी सांगितले.(Pune News) त्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकताच गौतमी पाटीलने तातडीने आपल्या मावशीला संबंधित रुग्णालयात पाठवले
माणुसकीच्या नात्यातून शक्य तेव्हढे उपचार करणार
दरम्यान, गौतमी पाटीलने एका व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती देताना, मी माझ्या वडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (Pune News) तसेच, त्यांना पुण्यालाही बोलावलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू होतील. माणूसकीच्या नात्यातून मी त्यांच्यावर शक्य तेवढे उपचार करणार आहे, असे गौतमीने म्हटले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : …अखेर तोतया लष्कर अधिकाऱ्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले