Pune News : पुणे : मामा-भाच्याचे नाते प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आपुलकीचे असते. येथे मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. दारु पिताना मामा आणि भाच्याचे टोकाचे वाद झाले. या वादातून भाच्याने सख्ख्या मामाच्या डोक्यात गज घालून त्याचा निघृण खून केल्याची घटना कोंढवा भागात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आनंद शंकरराव काळंगिरे (वय ४५, रा. हनुमाननगर, पिसोळी, पुणे) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. (Pune News ) दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गज घालून खून केला. याप्रकरणी भाचा सचिन राम एलनवाड (वय २५ रा. हनुमाननगर, पिसोळी, मूळ रा. खानापूर नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळंगिरे यांचा मुलगा हनुमंत (वय २३, रा. रामनगर, रहाटणी) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिनने मामा आनंद यांच्या डोक्यात दारू पिण्याच्या कारणावरून गज मारला. उपचार सुरू असतानाच आनंद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. (Pune News ) आनंद यांच्या मृत्यूप्रकरणी भाचा सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भरधाव कंटेनरच्या धडकेत ११ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
Pune News : अबब! शेवग्याला लगडल्या तब्बल साडेचार फूट लांबीच्या शेंगा