Pune News : पुणे : कागदी मतपत्रिकांच्या जागी १९८२ मध्ये ईव्हीएम मशिन भारतात आणण्यात आले. तेव्हापासून ईव्हीएमची कार्यक्षमता, अचूकता आणि पारदर्शकता यावर सातत्याने चर्चा होत आहे. आता ईव्हीएम मशिनच्या आधुनिकीकरणाच्या (अपग्रेडेशनची) मागणीने जोर धरला आहे. ईव्हीएमच्या आधुनिकीकरणाची मागणी करणारी प्रतिनिधित्व-नोटीस राजकीय नेते अभय छाजेड व रमेश अय्यर यांनी ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रीया आवले यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविली आहे.
अभय छाजेड व रमेश अय्यर यांनी पाठविली नोटीस
ईव्हीएमवर मतदानासाठी बटण दाबल्यावर मतदानाची जी माहिती व्हीव्हीपॅटवर दिसते. त्यात मतदानाची वेळ आणि तारीख यांची नोंद असायला पाहिजे. प्रत्येक मतदाराच्या मतदानाची वेळ आणि तारीख यांची नोंद होणे सुरू झाले तर जेव्हा मतमोजणीबाबत शंका असतील तेव्हा व्हीव्हीपॅटवरील नोंद झालेल्या मतांची मोजणी करून ईव्हीएमवरील मतमोजणीसोबत ते ताडून बघता येईल.(Pune News) हा मतदानाच्या तारिख आणि वेळ नोंदविण्याचा मोठा फायदा असेल, असे मत अभय छाजेड यांनी व्यक्त केले. व्हीव्हीपॅटवर प्रत्येक नागरिकांच्या मतदानाची वेळ आणि तारीख नोंद होऊन ती माहिती कायमस्वरूपी रेकॉर्ड म्हणून ठेवली जाईल आणि त्यातून मतदान मोजणी अधिक पारदर्शक होईल, त्यामुळे ईव्हीएमच्या तांत्रिक आधुनिकीकरणाची मागणी महत्वाची आहे आणि त्यासाठी आवश्यकता पडली तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समोर बाजू मांडणार असल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.
भारताच्या निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या ईव्हीएम मशीनवरील साशंकतेच्या प्रकरणात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली नसल्याचे निवडणूक आयोगाला पाठविलेल्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. अॅड. असीम सरोदे यांनी या नोटीसबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, मतदान करण्याचा कायदेशीर हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ईव्हीएमबाबत पूर्वी झालेल्या केसेसमध्ये नमूद केले आहे व त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत मतदानाला अन्यसाधारण महत्त्व आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळेच सुधारित ईव्हीएम मशीनची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. (Pune News) यावर सरकारने भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने २०१३ सालीच व्यक्त केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर १० वर्षे उलटून गेल्यानंतरही, ईव्हीएम मशीन्सचे अपग्रेडेशन करण्यात आलेले नाही. मतदानासाठी बटण दाबल्यावर मतदाराला वेळ आणि तारीख दाखवल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब व्हायला हवे.
व्हीव्हीपॅटवर मतदानाची तारीख आणि वेळ प्रदर्शित करणे अपरिहार्य आहे असे सांगून अॅड. श्रीया आवले म्हणाल्या की, भारतीय निवडणूक आयोगाला २६ जुलै २०२३ रोजी पाठवलेली निवेदनाच्या स्वरुपातील नोटीस ३१ जुलै २०२३ रोजी निवडणूक आयोग, दिल्लीच्या कार्यालयाला पोहोचली आहे आणि निवडणूक आयोगांतर्फे नोटिसवर उत्तराची प्रतीक्षा आहे. (Pune News) ईव्हीएम मशीन्सच्या अपग्रेडेशनमुळे कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराला दिलेल्या प्रत्येक मताचा प्रवास आणि तो मतदाराच्या अपेक्षित स्थळी पोहोचला आहे की नाही हे लक्षात येईल व नवीन लोकशाहीचा मार्ग प्रशस्त होईल असे अभय छाजेड म्हणाले.
केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने देखील ५ सप्टेंबर २००६ रोजी निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी ईव्हीएम मशिन्समध्ये अधिक व्यापक सुधारणा करण्याची शिफारस केली होती. (Pune News) त्यामुळे निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, अन्यथा ईव्हीएम मशीनमध्ये लोकशाहीपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी व मतदारांच्या व्यापक हितासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल असे अॅड. असीम सरोदे म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लवासात उभारणार पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वांत उंच पुतळा? एवढी असेल उंची…
Pune News : पावसाळ्यात अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास तर खबरदार..! महापालिका कारवाई करणार