Pune News : पुणे : कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.ललित पाटीलने नेपाळला पलायन केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटील याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. विशेष पथकासह गुन्हे शाखेची दहा पथके पाटीलच्या मागावर आहेत.
अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
नेपाळच्या सीमेवरून अटक केलेल्या दोन अमली पदार्थ तस्करांसह ललित पाटील याचे मेफेड्रॉन उत्पादन, विपणन आणि विक्रीचे मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता असून, त्याबाबत तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. (Pune News) पोलिसांची दहा पथके ललित पाटील याचा शोध घेत आहेत. दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशांमध्ये ललित पाटील मेफेड्रॉन पाठवत होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावात पाटीलचा भाऊ भूषण याच्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले.
पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आल्यानंतर पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पाटीलचा शोध घेण्यात येत आहे. पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील अनेक तस्करांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली. (Pune News) या कारवाईनंतर भूषण उत्तर प्रदेशात पसार झाला. गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ भूषण असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. एका लॉजमधून भूषण आणि अभिषेकला ताब्यात घेण्यात आले. दोघे नेपाळला पसार होण्याच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशातून पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, आरोपींकडे सापडलेल्या मोबाइलमधील डेटा त्यांनी फॉरमॅट केला आहे. तो डेटा सायबर तज्ज्ञांकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. (Pune News) आरोपींनी अमली पदार्थांच्या विक्रीतून किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा केली आहे, त्याचाही तपास पोलिस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवे संचालक पार्थ पवार?