Pune News : पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सततच्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना
रविवारी रात्री दहाच्या सुमारास अनभुले कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव ट्रकने (कंटेनर) त्यांना धडक दिली. यामुळे ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी भरधाव ट्रकने ११ वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने शाळकरी मुलांना दुखापत झाली नाही. (Pune News ) सततच्या अपघाताच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता तसेच पाच जण गंभीर जखमी झाले होते. यामुळे गोकुळनगर चौकात अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवशंभू प्रतिष्ठानसह परिसरातील विविध सामाजिक संस्थांकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News ) या वेळी राजस सोसायटी, सिल्वर ओक, श्रीनिवास संकुल, हॅमी पार्क, सुखदा वरदा संकुल, गंगा ओसियन, इरॉस इंटरनॅशनल, उत्कर्ष सोसायटी, यशश्री सोसायटी, आयडियल पार्क आदी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, रहिवासी सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ट्रेलरच्या धडकेत टेम्पो चालक जागीच ठार
Pune News : कोथरूडमध्ये दहशत माजवली; ओंकार कुडलेविरुद्ध मोक्का कारवाई
Pune News : गृहिणींसाठी गुड न्यूज! टोमॅटो आले आवाक्यात; आवक वाढली!