Pune News : पुणे : एकेकाळी डीसकेंच्या स्कीममध्ये घर घेणे हे मराठी पुणेकरांचे स्वप्न असायचे. पुण्याच्या विविध भागांमध्ये डीसकेंनी उभ्या केलेल्या स्कीम त्यांच्या लोगोसकट आजही दिमाखात दिसतात. याचे कारण डीएसकेंकडे घर घेतले की दर्जाची हमी असायची. डीसकेंची विश्वासार्हता वादातीत होती. ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी टॅगलाइन वापरून त्यांनी ९० च्या दशकात औद्योगिकरणामुळे पुण्यात नवश्रीमंत झालेल्या कित्येकांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. याच ‘डीएसकेडीएल’ कंपनीचे अस्तित्वच आता संपुष्टात आले आहे. या कंपनीचे सर्व समभाग मातीमोल झाले आहेत. ‘डीएसकेडीएल’च्या अडीच कोटी शेअर्सचे मूल्य शून्य झाले आहे.
जुलैमध्ये मुंबईतील अंशदान प्रॉपर्टीज् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘डीएसकेडीएल’अवसायनात गेल्यानंतर या कंपनीचा ताबा घेतला. (Pune News) त्यावेळी झालेल्या करारानुसारच ‘डीएसकेडीएल’ कंपनीतील सहभाग नष्ट करण्याचे ठरले होते. त्यानुसार आता २१ सप्टेंबर रोजी सुमारे अडीच कोटी समभागांची किंमत शून्य झालेली असेल.
घराला घरपण देण्याचे आश्वासन देणाऱ्या डीएसकेंच्या साम्राज्याचे अवमूल्यन
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने ‘डीएसकेडीएल’ कंपनीवर अवसायक म्हणून मनोज कुमार अग्रवाल यांची नियुक्ती केली. (Pune News) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २५ कोटी ८० लाख १० हजार ९० रुपयांचे प्रत्येकी दहा रुपयांचे २ लाख ५८ हजार ८ समभाग हे शून्य किमतीचे झालेले आहेत. मराठी मध्यमवर्गाला स्वतःच्या घराचं स्वप्न दाखवून, त्यांच्या घराला घरपण देण्याचे आश्वासन देणाऱ्या डीएसकेंच्या साम्राज्याचे अवमूल्यन झाल्याचे यानिमित्ताने पहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मैत्रीचा गैरफायदा घेत, तरुणीचे अपहरण करून बलात्कार; तरुणाला अटक