Pune News : पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला होता. यानंतर धंगेकर यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये महिला पुरवल्या जात होत्या. माझ्या या दाव्यात शंभर टक्के तथ्य आहे. तो व्हिडीओ मी समोर आणणार आहे. हॉटेलवर जाण्याआधी तो कोणाला भेटला. हॉटेलवर तो कोणाला भेटायला जायचा, हे सर्व त्या व्हिडीओत आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे. या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, ससूनच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद
धंगेकर म्हणाले की, ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसारखा गुन्हेगार ज्या सोसायटीत पळून गेला तिथे ज्याचा फ्लॅट आहे, त्या ठिकाणी तो आदल्या दिवशी राहिला होता. त्या फ्लॅटमध्ये महिला होत्या. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. पंचतारांकित हॉटेलात तो कशाला जात होता? एका बंगल्यात ड्रग्ज माफिया कसा ठेवला जात होता? असा सवाल त्यांनी केला. (Pune News) धंगेकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आजकाल १७-१८ वर्षांची मुले ड्रग्सच्या आहारी जात आहेत. त्यांच्या घराखालीच गांजा आणि अमली पदार्थ मिळत असतील, तर येणारी पिढी बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करा. आरोपीवर उपचार करणाऱ्या डीनसह जेवढे डॉक्टर आहेत, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा.
चौकीदारच चुकीचे वागत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार? पंजाबनंतर पुण्यात ड्रग्सचं मोठं रॅकेट आहे. ते थांबवा अशी विनंती मी विधानसभेत केली होती. (Pune News) पण त्यावर काही झालं नाही. पैसे खाण्यासाठी गुन्हेगारांना मोकळं सोडलं जात आहे. ललित पाटील प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असू शकतील. भारतातीलही गुन्हेगार असतील त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.
या प्रकरणात पोलीस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद आहे. देवेंद्र फडणवीसांनी राजकारण कमी करावे आणि या गोष्टांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. (Pune News) पोलीस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या वेळी धंगेकर यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लंपास; मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला सापळा रचून अटक
Pune News : दर्शनी भागात ओळखपत्र न लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Pune News : अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण