Pune News : पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. विसर्जन मार्गावरील रांगोळ्या, ढोल-ताशांचा गजर याचबरोबर गणेशोत्सवात लावले जाणारे बॅनर पुणेकरांच्या चर्चेचे विषय ठरतात. सकाळपासूनच गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. गणेश उत्सव मिरवणुकीत लावलेल्या एका बॅनरची चांगलीच चर्चा झाली. रिलस्टार पवन वाघुलकर याने बनवलेल्या या बॅनरची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. ”ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका”… असा मजकूर या बॅनरवर लिहिला असून, हा बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे.
बॅनरची सोशल मिडीयावर चर्चा
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांचा कमालीचा उत्साह दिसून आला. सकाळी १० वाजल्यापासून पुणेकर नागरिक या गणेश मिरवणुकीत सहभागी झाले होते. (Pune News) मानाच्या गणपतींची मिरवणूक देखील उत्साहात पार पडली. या मिरवणुकीदरम्यान पुणेरी बॅनरने लक्ष वेधून घेतले. रिलस्टार अथर्व सुदामे हा देखील गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्याच्यासह पवन वाघुलकर, डॅनी पंडित आणि इतर मित्रांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
रिल्सस्टार पवन वाघुलकर याने या वेळी ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका’ अशी पुणेरी पाटी हातात घेऊन, खास पुणेरी शैलीत पुणेकरांना संदेश दिला. (Pune News) पवन आणि अथर्व यांच्या पुणेरी पाटीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मिरवणूक मार्गावर ७५० किलो रंग अन् १२५० किलो रांगोळीच्या पायघड्या