Pune News : पुणे : पुण्यातील अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लॅम्बोर्गिनी मोटारीने एका भटक्या श्वानाला जोरदार धडक दिली. या धडकेत बिचाऱ्या मुक्या श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक हा सतत वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत असतो. हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या लॅम्बोर्गिनी मोटारीने धडक दिली आणि त्यानंतर तो मोटारचालक तसाच सुसाट वेगाने निघून गेला. (Pune News ) या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला. यासंदर्भात नीना नरेश राय (वय ५७) या महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार राय या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वानाला धडक दिल्याच्या घटनेनंतर राय यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. (Pune News ) पण, सुरूवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप राय त्यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला खो ; भवितव्य अधांतरी!