Pune News : पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) किरकटवाडी भागात एका किराणामाल दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री केली जात होती. हीच आता जीवावर उलटली असून या दुकानात झालेल्या गॅसगळतीनंतर उडालेल्या भडक्यात गंभीर भाजलेल्या १५ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Daughter’s life lost due to father’s illegal business in Pune; Death in explosion while filling gas from cylinder)
गीता मन्नाराम चौधरी (वय १५, रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
किरकटवाडी भागातील दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार मन्नाराम चौधरी (वय ४५) यांचे किरकटवाडी भागातील माळवाडी येथे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. किराणा माल दुकानात ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करीत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये (Pune News) गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोदाम भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदा गॅस भरायचे. गुरुवारी (एक जून) सकाळी गॅस भरत असताना गळती झाली आणि आगीचा भडका उडाला. लागलेल्या आगीत चौधरी आणि त्यांच्या दोन मुली गंभीररीत्या होरपळल्या. त्यांच्यासह लहान मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
उपचारादरम्यान सोमवारी (पाच जून) गीताचा मृत्यू झाला, (Pune News) तर दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : डॉ.रामकृष्ण ढेरे आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त…
Pune News : रोजगारासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्या : पालकमंत्री