Pune News : पुणे : कात्रज पोलीस चौकीत गोंधळ घालून टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. तसेच पोलीस शिपाई यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी केला गुन्हा दाखल
याप्रकरणी रोहित पवार (वय २६), सूरज कांबळे (वय १९), अजय अहिवळे (वय २४), राणी पाटील (वय २६), मयूर राऊत (वय २४, सर्व रा. खोपडेनगर), अल्फीया उर्फ लंगडी, खुशबू, आकाश यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) पोलीस शिपाई केतन लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात तृतीयपंथीय वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडून पैसे गोळा करतात. त्यांना सनी नावाचा एकजण त्रास देत होता. (Pune News) सनी दारु पिऊन त्यांना मारहाण करत असल्याने तृतीयपंथीयांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कात्रज पोलीस चौकीत नेले.
या दरम्यान, पोलीस चौकीत सर्व तृतीयपंथीय जमले. पोलिसांकडे त्यांनी सनीला ताब्यात देण्याची मागणी केली. समी मद्य पिऊन आम्हाला त्रास देतो. आम्ही त्याचा खून करणार आहोत, असे सांगून त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (Pune News) संतप्त तृतीयपंथीयांनी टेबलवरील कागदपत्रे देखील फेकून दिली. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस शिपाई लोखंडे यांना धक्काबुक्की केली.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जिल्ह्यातील शेकडो कलाकारांचे मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी साखळी उपोषण
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सहा झोपड्यांना भीषण आग
Pune News : कात्रजमध्ये अग्नितांडव! गॅस सिलिंडरच्या स्फोटात झोपड्या जळाल्या