Pune News : पुणे : सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या लिपीकाने 50 हजाराची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात हा प्रकार घडला आहे. सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी ही लाच लिपीकाने घेतली आहे. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने लिपीकास अटक केली आहे.
वेल्हे येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील प्रकार
पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर (लिपीक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. (Pune News) पंढरीनाथ यांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीकडून लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ तमनर यांनी सावकारी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र, लायसन्स मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपये आणि स्वत:साठी २० हजार रुपये अशी एकूण ५० हजार रुपयांच्या लाचेची संबंधित व्यक्तीकडे मागणी केली. (Pune News) तसेच मागणी केलेली रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितली. याबाबत ५५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० मे रोजी बँकेत भरलेल्या रकमेची चौकशी केली. चौकशी घटना उघड झाल्यानंतर सापळा रचून लिपीक पंढरीनाथ तमनर यांना अटक केली. त्यांच्यावर वेल्हे पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : काळजी मिटली ! ससूनमध्ये आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत मिळणार उपचार
Pune News : एनडीएतील मेजर पदावरील अधिकार्याला सासऱ्याने केली मारहाण