Pune News : पुणे : पुण्यात अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. याच दरम्यान, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळजाई येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. दोन मंडळांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला, त्यावेळी सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
महिला आणि लहान मुले गंभीर जखमी
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे शाळेजवळ दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. (Pune News) शेंडी टोळी आणि सूर्या टोळीमध्ये जुना वाद होता. तळजाई वसतिगृह परिसरात या दोन टोळींची दोन गणेश मंडळे आहेत. या दोन मंडळांमध्ये गणेश विसर्जनादरम्यान मारामारी झाली. या दोन गटांच्या भांडणामुळे महिला आणि लहान मुलांना मनस्ताप सहन करावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या गणेश मित्रमंडळ आरती करण्यासाठी शिंदे शाळेच्या विसर्जन हौदावर आले असता, इंद्रधनुष्य मंडळाच्या शेंडी टोळीने वाद घालण्यास सुरूवात केली. याचा जाब विचारला असताना, दोन्ही टोळींमध्ये तुफान हाणामारी झाली.(Pune News) मिळेल त्या वस्तूने एकमेकांच्या विरोधात वार-प्रतिवार सुरू होते. कार्यकर्ते रस्त्यावर पडलेले दगड एकमेकांना फेकून मारत होते. या टोळीयुद्धामध्ये महिला आणि लहान मुले देखील गंभीर जखमी झाली.
दरम्यान, अद्याप गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याने, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मिरवणूक मार्गावर ७५० किलो रंग अन् १२५० किलो रांगोळीच्या पायघड्या
Pune News : खुशखबर ! म्हाडासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ; आता या ; तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Pune News : पुण्यात विसर्जन मार्गावरील दणदणाटाने थरकाप; ओलांडली आवाजाची मर्यादा