Pune News : पुणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजप, राष्ट्रवादीसह इतरही पक्षातही आता पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांचे सत्र सुर आहे. असे असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिपाइंच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.
सहा ऑगस्ट रोजी मतदान
रिपाइंचे माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. माजी अध्यक्ष अशोक कांबळे आणि श्याम सदाफुले या वेळी उपस्थित होते. (Pune News) रिपाइंच्या पुनर्बांधणीसाठी शहरात नवीन अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण, तसेच हबीब सय्यद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. रिपाइंच्या सभासद नोंदणीची प्रक्रियाही २१ जूनपासून सुरू करण्यात आली असून, अंतिम मुदत २५ जुलै आहे. उमेदवारांना येत्या १९ जुलै रोजी चिन्हवाटप केले जाणार असून, याच दिवशी मतदारयाद्या जाहीर करण्यात येतील. सहा ऑगस्ट रोजी मतदान होईल.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे व श्याम सदाफुले यांची निवड करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पत्रकार गोळीबार प्रकरणी बंगळुरुमधून शॉपशुटर श्रेयश मतेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : बोरघाटात मालवाहतुकीच्या वाहनांची धडक; विद्यार्थ्यांसह तिघे जखमी