Pune News पुणे : पक्षीप्रेमी पक्षांना दाणे टाकताना आपल्याला सर्वसाधरणपणे दिसून येतात. परंतु पारव्यांना दाणे आता माणसाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पारव्यांना दाणे टाकताना कोणी आढळल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये
दंड करण्यात येणार आहे.
न्यूमोनिया व श्वसनाचे आजार वाढले..!
या पारव्यांमुळे न्यूमोनिया आणि श्वसनाचे इतर विकार बळावत असल्याने महापालिकेकडून या पारव्यांना खायला घालणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.
पुण्यातील अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पारवे दिसून येतात. पुण्यातील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, शनिवार पेठ, नारायण पेठ या ठिकाणी असलेल्या घाट आणि नदीकाठावर अनेक पुणेकर पुण्य मिळावं म्हणून रोज ज्वारीचे दाणे टाकले जातात.
शेकडो पारवे याठिकाणी जमा होतात. जमलेल्या शेकडो पारव्यांच्या थव्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. काही क्षुल्लक पक्षीप्रेमींमुळे अनेक पुणेकरांना या पारव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता दंड आकारण्यात येणार आहे.
फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ..!
शहरात पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे अनेक परिसरात पारव्यांचे थवे दिसतात. या पारव्यांच्या थव्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. पक्षांच्या विष्ठेमुळे आणि पंखातून निघणाऱ्या पावडरमुळे माणसाला फुफ्फुसाचे अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे शहरात न्युमोकेनियोसिस, पिस्टोप्लाझमोसिस सारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेकांना बराच काळ टिकणारा खोकला होत आहे आणि काही ठिकाणी श्वसनाचे आजार पसरत आहेत.
दाणे दिल्याने पारव्यांची संख्या वाढते…!
शहरात अनेक ठिकाणी पारव्यांना दाणे टाकले जातात. त्यामुळे पारवे काही विशिष्ट ठिकाणी जमा होतात. मात्र याच दाण्यामुळे पारव्यांची प्रकृती सुधारते आणि परिणामी पारव्यांच्या प्रजननाला याचा फायदा होऊन त्यांची संख्या वाढते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पारव्यांचे अड्डे तयार झाले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुणे महानगरपालिकेकडून क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत कुत्र्यांसाठी आता ;फिडिंग स्पॉट