Pune News : पुणे : शहरातील एका व्यावसायिकाची एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुप्रीत ओरसे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
एकाविरूद्ध गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आदित्य कमलेश श्रीवास्तव (वय २६, रा. विमाननगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीवास्तव यांची मार्केट वेब जेन कंपनी असून, या कंपनीकडून उत्पादनांचे विपणन केले जाते. (Pune News) आरोपी ओरसेने श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला होता. माझ्या कंपनीकडून देशासह परदेशात विपणनाचे काम केले जाते. आमच्या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने काही काम तुम्हाला देतो, असे ओरसेने श्रीवास्तवला सांगितले.
श्रीवास्तवला व्यावसायिक कामासाठी ४० टक्के परतावा देण्याचे आमिष ओरसेने दाखविले होते. त्यानंतर श्रीवास्तव यांनी त्याला २३ लाख ३२ हजार रुपये दिले. (Pune News) ओरसे याने श्रीवास्तव यांच्याकडील रक्कम तसेच केलेल्या कामाचे पैसे परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील ५० गुंड टोळ्यांविरुद्ध आयुक्तांची धडाकेबाज मोक्का कारवाई
Pune News : पुणे महापालिका ते भोसरी आता नॉन स्टॉप बस; प्रवाशांना मिळणार जलद सेवा!