Pune News : पुणे : कौटुंबिक वादातून भावाची भावानेच दोन बोटे तोडल्याचा धक्कादायक घटना उंड्री (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कडनगरमधील होले वस्तीत बुधवारी (ता.५) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
गणेश प्रकाश कड (रा. होले वस्ती, कडनगर, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मयुर प्रकाश कड (वय-३३, रा. कडनगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर कड व आरोपी गणेश कड हे नात्याने एकमेकांचे भाऊ आहेत. फिर्यादी मयुर हे पालखीला पंढरपूरला गेले होते. (Pune News) त्यावेळी आरोपी गणेश याने त्यांची आई, पत्नी व मुले यांना शिवीगाळ केली होती.
दरम्यान, फिर्यादी मयुर हे पालखीवरून घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समाजाला. त्यामुळे मयुर यांनी गणेश याला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. जाब विचारल्याचा राग मनात धरुन आरोपी गणेश याने मयुर यांच्यावर धारदार हत्याराने वार केला. (Pune News) मयुर यांनी हात आडवा घातल्याने तो वार हातावर बसून डाव्या हाताची दोन बोटे तुटली. त्यानंतर आरोपी गणेशने मयुर यांच्या मानेवर वार करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, गणेश कड याला अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तोरगल करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खुनाच्या गुन्हयातील अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची बदली…