Pune News : पुणे : तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याची उदाहरणे नुकत्यात पुण्यात घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येत आहेत. लग्नास नकार दिल्याने झालेली दर्शना पवारची हत्या, प्रेमाला नकार दिल्याने सदाशिव पेठेत तरुणीवर झालेला कोयता हल्ला, ही प्रकरणे ताजी असतानाच ब्रेकअप केल्याचा राग मनात धरून तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना औंध परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रभात प्रकाश पंडित यांच्याविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समाजमाध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, औंध परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीची प्रभात प्रकाश पंडित या तरुणाशी ओळख झाली. मैत्री वाढत गेली आणि कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Pune News) त्यानंतर काही कारणास्तव दोघांमध्ये खटके उडाले. याचे पर्यवसन ब्रेकअपमध्ये झाले. आपल्याशी ब्रेकअप केल्याचा राग मनात धरून प्रभात पंडित याने महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली.
ब्रेकअपमुळे संतप्त झालेल्या प्रभात पंडित या तरुणाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले. या खात्यावरून संबंधित तरुणीच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना आणि नातेवाईकांना अश्लील फोटो, मेसेज पाठवले. महिलेच्या भावाला सुद्धा मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली.(Pune News) तसेच गावात जाऊन तमाशा करेन, असा सज्जड दम भरला.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३५४, ५००, ५०४, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत प्रभात प्रकाश पंडित याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News) या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगड घाट रस्त्यावर ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्या ; नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Pune News : पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूरसह राज्यात ८ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये होणार