Pune News : पुणे : पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमध्ये शुक्रवारी (ता.२२) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत ही बस एका इमारतीच्या भिंतीला धडकवत थांबवली आहे. त्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि ३० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ३० प्रवाशांचे प्राण
हनुमंत मधुकर आढाळे असे समयसूचकता दाखवून प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आढाळे हे एनडीएकडून महापालिकेकडे बस घेऊन चालले होते. या बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. (Pune News) दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास ही बस कर्वेनगर जवळ आली.त्यानंत रबस वनदेवी मंदिरापासून गांधीभवनकडे उतारावर जात होती. त्यावेळी बसमधून जोरजोरात हवा गेल्यासारखा आवाज येऊ लागला.
तेव्हा चालक हनुमंत आढाळे यांना बसचे चाक पंक्चर झाल्यासारखे वाटले. त्यांनी ब्रेक मारून बस थांबविण्यासाठी प्रयत्न केला. पण, ही बस थांबत नव्हती. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज चालक आढाळे यांना आला. (Pune News) चालक आढाळे यांनी प्रसंगावधान राखत उताराजवळ असलेल्या योगदा अपार्टमेंटजवळील रुपी बँकेची शाखा असलेल्या इमारतीवर ही बस चढवली. कठड्याला धडकून मोठा झटका खात ही बस जागेवर थांबली.
दरम्यान, बसमधील प्रवाशांना नेमके काय घडले याचा अंदाज आलेला होता. सर्व प्रवाशांनी चालक आढाळे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले. (Pune News) ब्रेक फेल झालेली ही बस जर उतारावर गेली असती तर मोठा अपघात घडून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग
Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक
Pune News : बोपदेव घाटात तरुणीवर अमानुष बलात्कार; दोन नराधमांविरूद्ध गुन्हा दाखल