Pune News : पुणे : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आपल्या वयात आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी वारंवार अश्लिल चाळे करुन, नराधम बापानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याच नराधमाने स्वतःच्या पत्नीवर देखील अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
येरवडा, सुभाषनगर येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील सुभाषनगरमध्ये शनिवारी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. (Pune News ) याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४० वर्षांच्या बापावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, फिर्यादी आपल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात कोणी नसताना जवळ बोलवत असे. तिच्याशी अश्लिल चाळे करत असे. (Pune News ) ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. वादानंतर संतप्त होऊन आरोपीने फिर्यादींना मारहाण करुन धमकावले. त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.
याप्रकरणी संतप्त पत्नीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक
Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन… धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल
Pune News : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना मिळणार ‘स्वातंत्र्य’