Pune News : पुणे : शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथक दोन व हडपसर पोलिसांनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्याच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून चोरीच्या तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
१४ दुचाकी जप्त
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुजफ्फर उर्फ सलमान रफिक पठाण (वय- २६, रा. घुलेनगर, मांजरी खुर्द हडपसर/संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी आरोपी सलमान पठाण याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने पुणे शहरात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
दरम्यान, तपास पथकाने सखोल चौकशी केली असता, चौकशी दरम्यान आरोपीने बुधवारी (ता. २०) आणखी सहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. (Pune News) हडपसर पोलिसांनी २ लाख ८० हजार रुपयांच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये होंडा युनिकॉर्न, बजाज पल्सर, स्प्लेंडर, ग्लॅमर, होंडा शाईन, ड्रीम युगा अशा दुचाकी आहेत. आरोपीने या दुचाकी हडपसर, लोणी काळभोर, वाकड, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाहन चोरी करताना बसने निघत होता. वाहन चोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून जात होता. (Pune News) दुचाकी चोरी करुन घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपली चोरी उघडकीस येऊ नय यासाठी तो ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत होता. चौकशीअंती हे उघडकीस आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे-दौंड दरम्यान लोकल सेवेला हिरवा कंदिल
Pune News : गौतमी पाटीलचे कोल्हापुरातील कार्यक्रम अचानक रद्द; चाहत्यांना धक्का
Pune News : कयानीचा मावा केक अन् चितळेंच्या बाकरवडीवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब!