Pune News : पुणे : शहरातील मार्केट यार्डमधील आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या तीन महिलांना सौदी अरेबियात नोकरीची ऑफर दिली गेली. दर महिन्याला ३५ हजार रुपये पगार देण्याचे आश्वासनही दिले. मोठ्या पगाराच्या अपेक्षेने मुंबईतील एका एजंटमार्फत या महिला सौदी अरेबियात गेल्या. परंतु त्या ठिकाणी गेल्यावर महिलांसोबत धक्कादायक कृत्य घडले. उपासमार आणि मारहाणीमुळे महिला त्रस्त झाल्या. अखेर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने महिलांना सुखरूप मायदेशी आणण्यात यश आले.
पिडीत वीस महिलांची सुटका
मार्केट यार्डमधील आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या महिलांनी ओळखीतील मुंबईतील महिलेमार्फत एका एजंट महिलेशी संपर्क केला. सौदी अरेबियात काम देण्याचे आश्वासन महिलांना देण्यात आले. त्यासाठी सर्व कागदपत्रांची जमवाजमव करण्यात आली. मोठ्या पगाराच्या अपेक्षेने या महिला सौदी अरेबियात जाण्यासाठी तयार झाल्या. तेथे पोहोचल्यानंतर मध्यस्थ व्यक्तीने त्यांना विविध ठिकाणी घरकामासाठी पाठवले. (Pune News) घरकामासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर घरमालकांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच उपाशी ठेवले. शिवाय कामाचा पगार देखील दिला नाही. यामुळे या महिलांवर मोठे संकट आले. तेथून सुटकेसाठी महिलांची धडपड सुरू झाली.
दरम्यान, येथे सातत्याने होणारी मारहाण आणि उपासमारीमुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. सुटकेसाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांना एका व्यक्तीने राज्य महिला आयोगाचा ई-मेल आयडी दिला. त्यातील एका महिलेने महिला आयोगाला ई-मेल करत सुटकेची विनंती केली. महिला आयोगाने त्या मेलची दाखल घेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. (Pune News) तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर अखेर पिडीत महिलांना मायदेशी आणण्यात यश आले. या महिला सुखरूपरित्या शहरात परतल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. पिडीत वीस महिलांची महिला आयोगाने परदेशातून सुटका केली आहे.
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास, महिला आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार