Pune News पुणे : किल्ले सिंहगडावर रविवार (दि.18) हा सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.(Pune News) पण गडावर आलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. (Pune News)
सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉइंट परिसरात काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यात अनेक तरूण-तरूणी जखमी झाले आहेत. आज रविवार सुटी असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. त्यापैकी कोणीतरी मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचवली असेल, त्यामुळे मधमाशांनी हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तरुणींची आरडाओरडा
मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. तेव्हा काही मुली आरडाओरडा करत होता. त्यांच्या शरीरावर माशांनी चावा घेतलेला होता. त्यामुळे त्यांना आग होत हाेती. त्यांचा आवाज ऐकून इतर पर्यटक देखील गोंधळून गेले होते. काही हॉटेलचालकांनी धूर करून मधमाशांना दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही होऊ शकले नाही.
यापूर्वीही अनेकदा घडल्या घटना
सिंहगडावर मधमाशांचा हल्ला होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. यापूर्वी देखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी.