Pune News : पुणे : बारामती येथील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग या प्रशिक्षण संस्थेच्या दोन विमानांचा चार दिवसांत दोनदा अपघात झाला. या दोन अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने रेडवर्ड रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा देशभरातील परवाना निलंबित करण्याची मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएचे उड्डान प्रशिक्षण निर्देशक कॅप्टन अनिल गिल यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली.
डीजीसीए कंपनीच्या विमानांचे सखोल परीक्षण करणार
यासंदर्भात कंपनीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत कंपनीच्या विमानाचा झालेला हा पाचवा अपघात आहे. तर चार दिवसांत झालेला दुसरा अपघात आहे. यामुळे आता डीजीसीए कंपनीच्या विमानांचे सखोल परीक्षण करण्यात येणार आहे. (Pune News) तसेच प्रशिक्षकांची योग्यता आणि अधिकारांची तपासणी करण्यात येणार आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत देशभरात कंपनीचा परवाना निलंबित राहणार आहे.
गाडीखेल गावात रविवारी (ता. २२) सकाळी रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर कंपनीचे विमान कोसळले होते. त्यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी विमानाचा अपघात झाला होता. रविवारी झालेल्या अपघातात प्रशिक्षक आणि प्रशिक्षण घेणारा दोघेही जखमी झाले होते. त्यांना गावकऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Pune News) विमानाचे लॅंण्डींग करत असताना हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापूर्वी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कटफल गावाजवळ या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. त्या अपघातामध्येही पायलट आणि को-पायलट जखमी झाले होते.
दरम्यान, अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या टीमने चौकशी केली होती. या दोन्ही अपघातांचा अहवाल डीजीसीएकडे दिल्यानंतर कंपनीचा परवाना निलंबित करण्याची कारवाई झाली. (Pune News) कंपनीच्या विमानांच्या झालेल्या या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. सुदैवाने दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अजित पवारांच्या सभेत मराठा समाजाचा आक्रोष; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी
Pune News : युवकांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सरसावले; युवा संघर्ष पदयात्रेला प्रारंभ