Pune News : पुणे : दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या तब्बल १२ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या चोरट्यांच्या ताब्यातून १४ दुचाकी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एक चोरटा अल्पवयीन आहे.
तब्बल १२ गुन्हे केल्याची आरोपींची पोलिसांकडे कबुली
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अमलदार दिनेश भांदुर्गे आणि सचिन पाटील यांना घोरपडी गावात दोन मुले संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. (Pune News) त्यानंतर मोठ्या शिताफीने सापळा रचून दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, दुचाकी चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली.
दरम्यान, या सराईत चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १४ दुचाकी, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Pune News) गोरख विलास धांडे (वय २०, रा. शिवशंभू नगर, गोकुळ नगर, कात्रज) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश पाठक वैभव मोरे सचिन पाटील स्वप्निल रासकर यांच्या पथकाने केली.
शहरातील मुंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील राजगड, लोणावळा आणि सासवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरट्यांनी दुचाकी चोरल्याचे कबूल केले. (Pune News) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन
Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई