Pune News : पुणे : त्रास देणार्या पोलीस कर्मचार्याची तक्रार देण्यासाठी सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीत गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर चौकीच्या दारातच एका पोलीस कर्मचार्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना पायर्यांवर ढकलून त्यांचा विनयभंग केला. तसेच अश्लिल शिवीगाळ केली. प्रसंगावधान राखत पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
अभिरुची पोलीस चौकीतील प्रकार
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिसांनी निलेश आंद्रेस भालेराव (रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याला अटक केली आहे.(Pune News ) याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश भालेराव हा मुंबईत फोर्स वन येथे नेमणूकीला आहे. फिर्यादी २०१८ मध्ये एमआयए येथे नेमणुकीला असताना आरोपी निलेश हा फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी आला होता. (Pune News ) या वेळी त्याने फिर्यादीच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करुन विनयभंग केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
काही काळानंतर आरोपीच्या घरच्यांच्या विनंतीवरुन फिर्यादी यांनी तो गुन्हा मागे घेतला होता. गुन्हा मागे घेतल्यानंतरही भालेराव त्यांना वारंवार फोन करुन त्रास देत होता. (Pune News ) त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी या महिला अधिकारी अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतल्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास निघाल्या.
दरम्यान, त्याचवेळी निलेश तेथे आला. माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला, असे सांगून फिर्यादी या चौकीच्या बाहेर जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. पायर्यांवर दरवाजा लगत ढकलून त्यांचा विनयभंग केला. त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. (Pune News ) पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मराठा आंदोलनाला खेड तालुक्यात हिंसक वळण; टायर जाळून सरकारचा निषेध
Pune News : पुणे, पिंपरीत यंदा तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक फोडणार दहीहंडी…