Pune News : पुणे : अभिनेते अशोक सराफ यांनी सकस अभिनयासोबतच समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत, समाजमनावर संस्कार केले. अभिनयाच्या माध्यमातून हसवणे कठीण असते; मात्र, अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे महाकठीण काम अशोक सराफ यांनी केले. यामुळेच यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ अशोक सराफ यांना प्रदान
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी सराफ यांना मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (Pune News) त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कीर्ति सौरभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव, डॉ. प्रसन्न परांजपे, राधा पुरंदरे-आगाशे उपस्थित होते.
या वेळी विचार व्यक्त करताना अशोक सराफ म्हणाले की, प्रत्येक कलाकार हा मनस्वी असतो. कलेत विविधता आणण्याचा प्रयत्न तो सतत करत असतो. (Pune News) कलाकाराच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांचे पाठबळ मिळाल्यास त्याला कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मी केलेल्या प्रयत्नांना प्रेक्षकांची साथ लाभली हे माझे अहोभाग्य आहे, असे मी मानतो.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, अशोक सराफ हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांची नाटके नाट्यगृहात यशस्वी होतातच. (Pune News) कर्तृत्व आणि नम्रतेचा संगम म्हणजे अशोक सराफ आहेत. अशोक सराफ यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोंढव्यात अल्पवयीन मुलाला धमकी देत अत्याचार; तरुणीवर गुन्हा दाखल
Pune News : हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरूर-हवेलीत तिरंगा बाईक रॅली