Pune News : पुणे, ता.१६ : ”गदर” चित्रपट पाहून मंगला थिएटरबाहेर आल्यानंतर १० ते १२ जणांच्या टोळक्याने एकावर तलवार, कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१५) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
बदल्यातून खून केल्याची धक्कादायक घटना ;
नितीन म्हस्के असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश आनंदा वानखेडे (वय-३४, ताडीवाला रोड खड्डा झोपडपट्टी जनसेवा तरुण मंडळाजवळ पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार (Pune News)
सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड (सर्वजण रा. ताडीवाला रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील एकासोबत भांडण झाले होते. त्यावेळी म्हस्के याने आरोपी पैकी एकावर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हस्केचा काटा काढायचे ठरविले होते.
दरम्यान, नितीन म्हस्के हा पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मंगळवारी (ता.१५) रात्री गेला होता. त्याने गदर चित्रपट पाहिला. चित्रपट रात्री १ वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला. तेव्हा दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांनी म्हस्केला घेरले.
त्यानंतर १० ते १२ जणांनी त्यांच्या हातात असलेल्या तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गज याचा वापर करत म्हस्केवर हल्ला चढविला. या हल्ल्यात नितीन म्हस्के याचा जागीच मृत्यू झाला. व त्यानंतर सर्व आरोपी तेथून फरार झाले. Pune News