Pune News : पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना गाडीत होणारा त्रास आणि जागेवरून महिलांसोबत वाद झाल्याच्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेत, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रेल्वे सुरक्षा बलाकडून १५ ऑगस्टपासून तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले आहे. रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक ७२१९६१३७७७ बद्दल जागरुकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
जागरुकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट
तेजस्विनी पथक विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सुरक्षा बल उदयसिंह पवार यांच्या नेतृत्वात हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे. या तेजस्विनी पथकामध्ये सहायक उपनिरीक्षक पूनम शर्मा आणि २ महिला आरपीएफ कर्मचारी असून, हडपसर येथील निरीक्षक प्रिती कुलकर्णी या पथकाचे पर्यवेक्षण करत आहेत. Pune News
पुणे ते लोणावळा पर्यंतच्या रेल्वे एस्कॉर्ट हे पथक करत आहे. तसेच डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड एक्स्प्रेस आणि दैनंदिन लोकल सेवांमध्ये दररोज महिला प्रवाशांशी संवाद साधला जात आहे. यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करण्यात आला असून यामध्ये पुणे, शिवाजीनगर, हडपसर येथील आरपीएफ ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, विभागीय सुरक्षा नियंत्रण क्रमांक, यात्री सुरक्षा निरीक्षक आणि चिंचवड यांच्यासोबत दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना जोडण्यात आले आहे. Pune News
गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी आणि रेल्वेतील सुरक्षेबाबत वेळेवर सूचना देण्यासाठी, घटनांचे वेळेवर अहवाल देण्यास यामुळे मोठी मदत मिळणार आहे. महिलांवरील हिंसाचार हा खासगी विषय नसतो. हिंसाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती करण्यासाठी आरपीएफ विभागातर्फे मोहीम राबवली जात आहे. महिला प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करून, हे तेजस्वीनी पथक महिला प्रवाशांच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध असणार आहे.