Pune News : पुणे : नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. गावडे हे हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावचे सुपुत्र आहेत. केंद्र शासनाने त्यांची आय.ए.एस.पदी पदोन्नती केल्यामुळे हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाडेबोल्हाईचे ग्रामस्थ करणार सन्मान
रघुनाथ गावडे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. ध्येय गाठण्याच्या उद्देशाने त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. १९९५ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. मात्र, शिक्षणाची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते प्रयत्न करत होते. महसूल विभागातही त्यांनी विविध ठिकाणी काम केले.(Pune News ) नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा (जि. नंदुरबार) येथे झाली. तेथेही त्यांनी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे काम उत्कृष्टपणे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला.
यश मिळाल्यानंतर गावडे यांनी मागे वळून पाहिले नाही. धुळे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी, नाशिक विभागात एम.आय. डी. सी.चे प्रादेशिक अधिकारी एवढेच नव्हे, तर मालेगाव या अतिशय संवेदनशील भागात त्यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत अपर जिल्हाधिकारी या महत्वाच्या पदावर काम केले. हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा वाढवण्यासाठी व समाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.(Pune News ) त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळेच धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी ‘मेळा अधिकारी’ या अत्यंत महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती केली. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व अचूक नियोजनासाठी हा कुंभमेळा लक्षात राहिला. या उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिेकेत देखील घेतली गेली. (Pune News ) या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मध्यप्रदेश राज्याने देखील त्यांना उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते.
नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २०१७-२० या कालावधीत त्यांनी उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर लक्षणीय काम केले. या संपूर्ण सेवाकाळातील २५ वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची आय.ए.एस. या प्रतिष्ठेच्या पदी पदोन्नती केली.(Pune News ) या संपूर्ण कालावधीत त्यांना त्यांचे बंधू विठ्ठल खंडू गावडे व पत्नी रूपाली यांनी मोलाची साथ दिल्यामुळे त्यांनी हे घवघवीत यश मिळवले.
रघुनाथ गावडे यांच्या घवघवीत यशाबद्दल बोलताना वाडेबोल्हाई ग्रामस्थ बापूसाहेब भोर म्हणाले की, गावडे परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची बाब अभिमानास्पद असून, वाडेबोल्हाई व पंचक्रोशीमधील नागरिक तसेच संपूर्ण हवेली तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांकडून त्यांच्या अविरत सेवेबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : संतापजनक! तीन अल्पवयीन मुली गर्भवती; पुण्यात एकाच दिवशी पोक्सोचे तीन गुन्हे दाखल!