Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पिंपरी-चिंचवडकरांची ‘भूमी अभिलेख’ साठी थांबणार पायपीट ; ‘ती’ गावे पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी जोडण्यास राज्य सरकार सकारात्मक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 16:30

 Pune News : (पिंपरी) भूमी अभिलेख कार्यालयातील कामांसाठी पिंपरी चिंचवडकरांची ‘ हवेली कार्यालयात होणारी पायपीट थांबणार आहे. महापालिका हद्दीतील गावांचा समावेश आता हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत होण्याच्या हालचाली सुरू आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच त्या बाबत सकारात्मकता दर्शवली आहे. भाजपा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमूख तथा आमदार महेश लांडगे यांनी या बाबत पाठपुरावा सुरू केला असून त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सुचना मंत्री विखे-पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. (Pune News)

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व आमदार महेश लांडगे यांच्यात सविस्तर चर्चा…

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालय येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी भूमी अभिलेखच्या मागण्यांबाबत आमदार लांडगे यांनी निवेदन दिले.

भूमी अभिलेख कार्यालयातून शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. (Pune News)

 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावांचा समावेश हवेली भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत येत होता. त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात आपल्या कामांसाठी जावे लागते. या ठिकाणी काम न झाल्यास पुन्हा जावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता. मात्र आता नागरिकांची ही गैरसोय टळणार आहे. (Pune News)

पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील काही गावांचा हवेली तहसील कार्यालय अंतर्गत समावेश होता. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्नीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तहसीलशी संबंधीत कामांची होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे.

त्याच धर्तीवर भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहेत. ही गावे भूमी अभिलेख कार्यालय पिंपरी- चिंचवड या कार्यालयाशी संलग्नील करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्डच्या या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची भौगोलिक दृष्ट्या गैरसोय टळेल, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली. (Pune News)

याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्या बाबतचा प्रस्ताव त्वरीत सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

दरम्यान, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, च-होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्नीत करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. (Pune News)

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखाच्या घरात आहे. पूर्वी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे क्षेत्र लोकसंख्या कमी असल्याने सोयीचे होते. मात्र आता पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना भूमी अभिलेख संदर्भातील कामांसाठी पुण्यात जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी महसूलमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडशी संबंधित गावे जोडण्याची मागणी केली. लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Hadapsar News : पुण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सायबर चोरट्यांचा दणका ; 'फेसबुक हॅक' करून नातेवाईकाकडून रक्कम लाटली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.