राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयास नॅक मुल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीमध्ये ३.१२ गुणांसह ‘अ’ श्रेणी प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी दिली.
पिरंगुट ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघाने केले अभिनंदन
महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी नॅक मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. नॅक पिअर टिमकडून आलेल्या अहवालात महाविद्यालयास ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. (Pune News) याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव आदी संस्था पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी वृंद, महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी संघ व पिरंगुट ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.
या वेळी पिरंगुटचे ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघ यांनीही महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. या विशेष सत्कार समारंभात बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या की, आपणा सर्वांच्या सहकार्याने हे यश संपादन करता आले. (Pune News) यापुढेही महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी अविरत प्रयत्न केले जातील. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, नॅक समन्वयक प्रा. शहाजी शिंदे, सहायक समन्वयक डॉ. तानाजी काशीद, सर्व क्रायटेरिया प्रमुख, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व पालक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक; पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे मत
Pune News : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मकोका; पुणे पोलिसांची मोठी कारवाई