Pune news : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली. राष्ट्रवादीच्या २४ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करताच, अजित पवार यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (Ajitdada’s best wishes to Supriyatai for the new innings; said…)
अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ सावा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.(Pune news) शिवाय खासदार पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के. के. शर्मा, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, पी. पी. महोम्मद फैजल, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे अजित पवार यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरेसमोर राष्ट्र’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!’ असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. (Pune news) दरम्यान, शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवलीच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आषाढी वारीत मोबाईल चोरण्याचा कट पोलिसांनी उधळला; दोघांना ठोकल्या बेड्या…
Pune News : गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणास अटकपूर्व जामीन मंजूर