Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून वेगळी चूल मांडली. रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मंत्र्यांना संध्याकाळपर्यंत खाती दिली जाणार आहेत. काही महत्त्वाची खाती अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांना महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खाती वाटपाची चर्चा सुरू आहे. महत्त्वाची आणि अधिकाधिक खाती आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सुरू आहे.(Pune News) त्यामुळे या खात्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांना महसूल किंवा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. (Pune News) छगन भुजबळ ओबीसी कल्याण, दिलीप वळसे पाटील संसदीय कार्य आणि कृषी मंत्रालय, हसन मुश्रीफ औकाफ आणि कामगार कल्याण मंत्रालय, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं, धनंजय मुंडे यांना समाज कल्याण मंत्रालय, संजय बनसोड क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तर धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबादारी देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार गटाकडे जाणारी महत्त्वाची पदे
– अर्थ किंवा महसूल
– क्रीडा आणि युवक कल्याण
– महिला आणि बाल विकास
– अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय
– मासेमारी, वस्त्र मंत्रालय
– मागास आणि बहुजन कल्याण
– वाहतूक
– गृहनिर्माण
– अल्पसंख्याक आणि वक्फ
– सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन
– पशुसंवर्धन
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Pune News) राज्यपालांची सही झाल्यानंतर अधिकृतरित्या खाते वाटप जाहीर केले जाणार आहे. चांगले खाते मिळवण्यासाठी अनेक मंत्र्यांचे लॉबिंगही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्र्यांमध्ये चांगेल खाते मिळावे यासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी देखील खाते वाटपात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते ‘दादा’ विराजमान होणार?; चर्चांना उधाण!