Pune News : पुणे : खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असलेल्या नागरिकांसाठी एक खूषखबर आहे. पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत फिरणारी आणि मानवाला उघड्या डोळ्यांनी दिसणारी सर्वात मोठी मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएसएस). हे स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.
फुटबॉलच्या मैदानाएवढे आकाराने मोठे असणारे हे स्थानक पृथ्वीभोवती ४०० किलोमीटर उंचीवरून दिवसाला जवळपास १५ फेऱ्या पूर्ण करते. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. (Pune News) हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० किलोमीटर उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.
संशोधन आणि विविध चाचण्या करणे हे या स्थानकाचे उद्धिष्ट
हा एकंदर १६ देशांनी एकत्रित केलेला प्रकल्प असून, अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. २० नोव्हेंबर १९९८ पासून आतापर्यंत म्हणजे १९ वर्षांहून जास्त काळ ते त्याचे काम अतिशय उत्तम करत आले आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खागोलशास्त्र, हवामानशास्त्र इत्यादीबद्दल संशोधन आणि विविध चाचण्या करणे हे या स्थानकाचे उद्धिष्ट आहे.
अवकाश स्थानक आपल्या भागातून जाते, त्यावेळी काही वेळापुरते ते चमकत्या फिरत्या चांदणीसारखे पाहता येते. ४ ऑक्टोबरला रात्रीच्या प्रारंभी ७.०३ वाजता क्षितिजापासून १४ अंशावर उत्तर ते पूर्व दिशेला दीड मिनिटे, ५ ला. रात्री ७.५० वाजता, २८ अंशावर वायव्य ते उत्तर बाजूस पावणे दोन मिनिटे, ६ रोजी रात्री ७.०२ पासून साडेचार मिनिटांपर्यत ५४ अंशावर वायव्य ते आग्नेय दिशेला अतिशय चांगल्या स्वरुपात पाहता येणार आहे. (Pune News) ७ रोजी रात्री ७.५२ वाजता पश्चिम ते नैॠत्य बाजूला क्षितिजाजवळ पावणेतीन मिनिटे १३ अंशावर आणि ८ ऑक्टोबरला रात्री ७.०३ वाजता पश्चिमेकडून दक्षिणेकडील आकाशात २८ अंशावर पावणेसहा मिनिटे बघता येईल. हा अनोखा आकाश नजारा सर्वांनी अवश्य बघावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.
सध्या या स्थानकावर मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे. (Pune News) संशोधन करण्यासाठी साधारणपणे दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू पृथ्वीवरून पाठविला जातो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्ह्यात जुन्या-नव्या ३८८ ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; जोरदार मोर्चेबांधणी
Pune News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर गुंडाचा जीवघेणा हल्ला