Pune News : पुणे : लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागून ३० ते ४० दुकाने भस्मसात झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. ही आग आटोक्यात आणून घरी निघालेल्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या दुचाकीला लोहगाव परिसरात भरधाव पीएमपी बसने धडक दिली होती. या भीषण अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. दरम्यान, हा दावा लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यात आला असून, अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ८४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी झाला होता अपघाती मृत्यू
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागून ३० ते ४० दुकाने भस्मसात झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. पुणे कटक मंडळाच्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांनी अथक प्रयत्नांती आग आटोक्यात आणली होती. (Pune News) आग आटोक्यात आणल्यानंतर कामावरून घरी निघालेल्या अधिकाऱ्याच्या दुचाकीला लोहगाव परिसरात पीएमपीने धडक दिली. या अपघातात अधिकाऱ्याचा दूर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात ॲड. सुनीता नवले यांच्यामार्फत गो डिजिट इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. (Pune News) संबंधित अधिकाऱ्याचे वेतन दरमहा ९० हजार रुपये होते. अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी दाव्यामध्ये केली होती. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ८४ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
या वेळी गो डिजिट इन्शुरन्स कंपनीचे सुखप्रीतसिंग, अमृता सिन्हा उपस्थित होते. कंपनीकडून ॲड. द्रविड यांनी काम पाहिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मैत्रीचा गैरफायदा घेत, तरुणीचे अपहरण करून बलात्कार; तरुणाला अटक