Pune News : पुणे : लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपलं. पण अंगणवाडी सेविकेने कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपल्या दोन्ही मुलींना शिकविले. मात्र, दोन्ही लेकींनी आईचे पांग फेडलं. जिद्द, मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कितीही कठीण गोष्ट पूर्ण करता येते, हे खुलताबादमधील दोन सख्ख्या बहिणींनी सिद्ध करून दाखविले आहे. यामधील एक मुलगी PSI तर दुसरी STI झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या मुलींनी आईच्या कष्टाचे चीज केले.
एक PSI तर दुसरी STI…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पूजा तेजराव काळे हि पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झाली आहे. तर कविता तेजराव काळे (दोघीही रा. तजनापुर, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) ही राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. (Pune News) गावातील पहिल्या अधिकारी होण्याचा या दोन सख्ख्या दोन बहिणींनी बहुमान मिळविला आहे.
पूजाचे वडील तेजराव हे शेती करून कुटुंबाचा उदार्निवाह चालवीत असे. पूजा तीन वर्षांची असताना त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. त्यानंतर ते ३ वर्षे आजारी होते (Pune News) आणि पूजा ६ वर्षांची असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी अचानकपणे येऊन पडल्यानंतर आईने खचून न जाता अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठबळ दिले.
पूजाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेले असून, माध्यमिक शिक्षण बाजार सावंगी येथे झालेले आहे. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी तयारी सुरू केलेली होती. पूजाला सुरुवातीला एक दोन परीक्षांमध्ये अपयश देखील आले. मात्र, त्यानंतर त्यांनी जिद्द न सोडता लढण्याचे ठरवलेले होते.
माझ्या यशाचे श्रेय कुटुंबियांना
याबाबत बोलताना पूजा म्हणाली की, ‘आमचं छोटसं खेडेगाव आहे या गावांमध्ये शिक्षणाच्या सुविधा नसताना, वडिलांचे छत्र हरपले नंतर आईने आम्हाला कष्टाने शिकवलं. भावाने विश्वासाने आम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. (Pune News) लग्नानंतरही माझ्या शिक्षणाला पतीने प्रोत्साहन दिले. यामुळे आज मी पोलीस उपनिरीक्षक झाले आहे, याचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबीयांना जाते’.