Pune News : पुणे : शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावले आहेत. असे असताना पाऊस आल्यामुळे आडोशाला थांबलेल्या तरुणाला तारेच्या कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कोंढवा भागात घडली आहे. याघटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रम्हा इस्टेट सोसायटी नजिकची घटना
अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विनोदकुमार फेरारीराम वर्मा (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोदकुमार यांचा मुलगा अजयकुमार कामानिमित्त घरातून बाहेर पडला. अचानक पाऊस सुरू झाल्याने अजयकुमार कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ थांबला. तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला होता. (Pune News) विनोदकुमार याच्या हाताचा स्पर्श तारेच्या कुंपणास झाला. कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून तो बेशुद्ध पडला. नागरिकांनी बेशुद्धावस्थेतील अजयकुमारला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, तसेच तारेच्या कुंपणात वीजप्रवाह कसा उतरला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर होणार ; निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब