Pune News : पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोन तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयटी ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. (A young man from Jeevansaathi.com site cheated a young woman of 23 lakhs; Incident in Chandannagar area..)
चंदननगर परिसरातील घटना..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची जीवनसाथी डॉट कॉम वर विराट पटेल याची ओळख झाली होती. पटेल याने आपण परदेशात काम करीत असल्याचे सांगून फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले.(Pune News) त्यानंतर त्याने परदेशातून काही मौल्यवान वस्तू गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. तसेच दिल्ली एअरपोर्टवर हे गिफ्ट कस्टमने अडविल्याचे सांगितले.
इम्पोर्ट चार्जेस म्हणून त्यांच्याकडून सुरुवातीला ३२ हजार ९०० रुपये मागितले. त्यानंतर इन्कम टॅक्स, डिलिव्हरी टॅक्स चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. (Pune News) तसेच विराट पटेल याने आपल्याला चेक इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करुन घेण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तिच्याकडून आणखी पैसे मागितले.
दरम्यान, अशा प्रकारे तिने १३ लाख ५३ हजार ९६९ रुपये भरल्यानंतर एअरपोर्टवरील व्यक्ती तिला आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगत राहिली. तेव्हा तिने हा प्रकार आपल्या नातेवाईक तसेच वकिलाला सांगितला. त्यांच्याकडून असे प्रकार एअरपोर्टवर घडत नाही, असे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (Pune News) तसेच खराडी येथे राहणाऱ्या आणखी एका तरुणीला ९ लाख ३० हजार रुपयांना फसविण्यात आल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलिस तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अभिमानास्पद..! इतिहासामध्ये पहिल्यांदा महिलेने चालवली सासवड ते नीरा मार्गावर एस. टी.बस
Pune News : पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल