Pune News : पुणे : वडिलांनी परस्पर नावावर कर्ज काढल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. १८ मे २०२३ रोजी हि घटना घडली असून याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार मुलाचे आईवडिल, भावावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडिल, भावावर गुन्हा दाखल..
अभिजित मच्छिंद्र कदम (वय ३८, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी दिपाली अभिजित कदम (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.(Pune News) त्यानुसार पोलिसांनी अनिकेत मच्छिंद्र कदम (वय ३१), सासु कुसुम मच्छिंद्र कदम (वय ५६) आणि सासरे मच्छिंद्र नामदेव कदम (वय – ६२) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती अभिजित कदम हे गेल्या ५ – ६ वर्षांपासून सासु सासर्यांपासून वेगळे रहात आहेत. (Pune News) अभिजित हे महापालिकेत कामगार पुरविण्याचे काम करतात. अभिजित यांच्या वडिलांनी त्याच्या नावावर कर्ज काढले होते. त्या कर्जाचे हप्ते अभिजित याच्या खात्यातून वळते केले जात होते.
त्यामुळे त्याने नेमलेल्या कामगारांचे पगार, त्यांचा पॉव्हिडंट फंड व अन्य बाबीसाठी पैसे कमी पडत होते. त्यांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. वडिल, भावाकडे त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी नकार दिला होता.(Pune News) त्यामुळे अभिजित आर्थिक अडचणीत आला होता.
दरम्यान, त्याने ही सर्व बाब सुसाईट नोट मध्ये लिहून १८ मे २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या या सुसाईट नोटमध्ये खाडाखोड असल्याने पोलिसांनी ती तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कर्वेनगरमध्ये पीएमपी बसचे ब्रेक फेल
Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग
Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक